• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण नगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात खोदकाम; प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे

ByEditor

May 31, 2024
सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्गाना मॅनेज करून खोटी कागदपत्रे सादर करून परवानगी घेतल्याचा घोटाळा लवकरच उघड होणार आहे. यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.

घनःश्याम कडू
उरण :
उरण नगरपालिका हद्दीतील मोठमोठे इमारतींचे टॉवर उभारण्यासाठी खोदकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत नगरपालिका मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकताना दिसत आहेत. तरी याची चौकशी करण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.

उरण नगरपालिका हद्दीत इमारतींचे जाळे विणले जात आहे. तर काही ठिकाणी मोठे टॉवर उभारण्यासाठी खोदकाम करून मातीची विक्री केली जात असल्याचे समजते. तरी यासाठी कायदेशीर परवानगी दिली आहे का? याची विचारणा मुख्याधिकारी समीर जाधव यांच्याकडे केली असता, ते तुम्ही लेखी अर्ज करा मग बघतो असे थातूरमातूर उत्तर देऊन एकप्रकारे खोदकाम करणार्‍यांची पाठराखण केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी तक्रारी करूनही तक्रारदारांना आजतागायत कोणतीच कारवाई केल्याचे दिसत नाही. त्यामुळे माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता तीही देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

अशा प्रकारे नियमांची पायमल्ली केली जात आहे. तसेच याबाबत लेखी तक्रार अथवा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता ती व्यवस्थित दिली जात नाही. यावरून यामध्ये असे काम करणार्‍यांबरोबर नगरपालिका अधिकारी वर्गाचे आर्थिक हितसंबध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरी याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!