• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगावच्या सारा चौधरीला व्हायचंय डॉक्टर!

ByEditor

Jun 3, 2024

सलीम शेख
माणगाव :
येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शिवचरण चौधरी यांची नात व अमर शिवचरण चौधरी यांची कन्या सारा चौधरी हिने बारावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीबीएस डॉक्टर होण्याची ईच्छा आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना व्यक्त केली.

सारा चौधरी हि लहानपणापासूनच बुद्धीने अत्यंत तल्लक असून तिला वाचन, लेखन व वेगळं काहीतरी करण्याची आवड आहे. तिने माणगाव येथील एस. एस. निकम इंग्लिश स्कुलमध्ये शिकत असताना दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ९१% इतके गुण संपादन केले होते. त्यानंतर साराने आपले पुढील अकरावी ते बारावी महाविद्यालयीन शिक्षण माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालय ज्युनियर कॉलेज येथे विज्ञान शाखेतून घेतले. या ठिकाणी साराने फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी प्रमाणपत्र परीक्षेत विज्ञान शाखेतून ८७.८३ % इतके गुण संपादन करून तिने कॉलेजबरोबरच आपल्या आजी-आजोबांचे, आई-वडिलांचे व चौधरी कुटुंबियांचे नाव रोशन केले. सारा हिने दहावी व बारावी परीक्षेत प्रचंड जिद्द, चिकाटी व अथक परिश्रम घेत दैदिप्यमान असे उज्वल यश प्राप्त केले.

बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आता पुढे ती नीट परीक्षेचा अभ्यास करीत असून तिने एम.बी.बी.एस. डॉक्टर होण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. बारावी प्रमाणपत्र परीक्षेत तिने प्राप्त केलेल्या उज्वल यशाबद्दल तिचे माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, सुरव तर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सखाराम जाधव, पत्रकार सलीम शेख, दीपराज चौधरी यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!