• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल; पेण तालुक्यातून शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती

ByEditor

Jun 8, 2024

विनायक पाटील
पेण :
कोकण विभाग पदवीधर मतदार संघात निरंजन डावखरे यांचा अर्ज भरण्यात आला. यावेळी आमदार रवीशेठ पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, मिलिंद पाटील यांच्यासह पेण तालुक्यातून सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. २६ जूनला सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. कोकण विभागात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. गुजरात राज्याची सीमा ते गोवा राज्याच्या सीमेपर्यंत हा मतदार संघ असून त्यात ४८ तालुक्यांचा समावेश आहे. या निवडणुकीत अडीच लाख पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यामध्ये सर्वाधिक मतदान ठाणे जिल्ह्यात ७३ हजार ३०५, रायगड – ४५ हजार ३३८, रत्नागिरी – २१ हजार ४२४, पालघर – ९ हजार ४८१, सिंधुदुर्गमध्ये १७ हजार ८४८ मतदारांची नोंदणी झाली आहे. चिपळूण तालुक्यात एकूण ४ हजार ५४ पदवीधर मतदार आहेत. चिपळूण तालुक्यात एकूण पाच मतदान केंद्र आहेत. मार्गताम्हाणे मतदान केंद्र क्र. ८६ यामध्ये २५९ मतदार, सावर्डे मतदार केंद्र ८४ येथे १२८४ मतदार, अलोरे मतदार केंद्र ८५ येथे एकूण ४१० मतदार तसेच चिपळूण तहसील केंद्रात एकूण दोन मतदान केंद्रे असून, मतदान केंद्र क्र. ८२ यामध्ये एकूण मतदार १११० तर मतदार केंद्र क्र. ८३ तहसील कचेरी चिपळूण यामध्ये एकूण १०९८ इतके मतदार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १७ मतदान केंद्र आहेत. कोकण पदवीधर मतदार संघात विधान परिषदेमध्ये आतापर्यंत भाजपचा वरचष्मा राहिला आहे. भाजपने डावखरे यांना तिसऱ्यांदा संधी दिली आहे. पेण तालुक्यातून जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील हे पदवीधरांशी संपर्क साधत आहेत. सर्व पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. यामध्ये मतदान करताना पदवीधरांनी मतदान केंद्रावर उमेदवारांची यादी असेल त्या ठिकाणी तिथल्या पेनाने पसंती क्रमांक एक असे लिहिल्यानंतर मतदान पूर्ण होते. इतर निवडणुकांसारखे येथे चिन्हे नसतात. जेवढे उमेदवार निवडणुकीला उभे असतात त्या सर्वांचा पसंती क्रमांकावर आकडे लिहून मतदान करता येते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!