१३ हजारांची चोरी; चोरटे सीसीटीव्हीत कैद
गणेश पवार
कर्जत : नेरळ-कर्जत राज्यमार्गावरील देऊळवाडी येथील तब्बल ५ दुकाने चोरट्यांकडून लक्ष करण्यात आली आहेत. शुक्रवारच्या पहाटे या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी यातील १३ हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे. राज्यमार्गावर झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांडून करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मौजे कर्जत बदलापुर राज्यमार्गावरील देऊळवाडी येथे रस्त्यावर ५ दुकानं आहेत. शुक्रवार दिनांक ७ जून रोजी पहाटेच्या सुमारास या दुकानाचे शटर चोरट्यांनी उपकुन आत प्रवेश केला. तसेच दुकानातील १३ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दुसऱ्या दिवशी दुकानाचे मालक दुकान उघडायला आले असता त्यांच्या लक्षात संबंधित प्रकार आला. त्यामुळे त्यांनी तडक कर्जत पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान हि घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे. कर्जत पोलीस ठाणे येथे भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार समीर भोईर हे करीत आहेत.