• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

धक्कादायक! पाच महिन्यांच्या बाळाला जमीनीवर आपटले

ByEditor

Jun 10, 2024

निर्दयी बापाविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अनंत नारंगीकर
उरण :
आपल्या आईच्या कुशीत विसावलेल्या पाच महिन्यांच्या बाळाला जन्मदात्या बापाने हिसकावून घेऊन जमिनीवर आपटल्याची दुर्दैवी घटना बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (दि. ९) घडली. या घटने संदर्भात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात असून राक्षसी वुत्तीच्या नराधम बापाला उरण पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमुता खुशीराम ठाकूर ही विवाहित महिला आपले पती खुशीराम गजानन ठाकूर यांच्यासोबत बोकडविरा ग्रामपंचायत हद्दीत भाड्याच्या खोलीत काही दिवसांपासून राहत आहेत. त्याच्या कुटुंबात रुही नावाची कन्या जन्माला आली होती. अमुता व तिचे पती खुशीराम यांच्यात रविवारी (दि. ९) दुपारच्या सत्रात भांडण झाले असता अमुता ठाकूर हिने आपल्या पाच महिन्यांच्या रुहीला घेऊन शेजारी राहत असलेल्या आपल्या नातेवाईक बिन्नीलाल बुधाराम यांच्या घरी जाणे पसंत केले. मात्र, अंगात भूत संचालेल्या खुशीराम ठाकूरने अमुताच्या मागेमागे जाऊन “हमारी लडकी दे दो” असे बोलत मुलगी घेण्यावरून भांडण सुरू केले.

यावेळी आपल्या कुशीत विसावलेल्या आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला देण्यास आई अमृताने विरोध केला असता खुशीरामने रुही या तान्ह्या बाळाला आईच्या ताब्यातून हिसकावून घेऊन जमिनीवर आपटले. या घटनेत रुही या पाच महिन्यांच्या बाळाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती मरण पावली आहे. या घटनेची माहिती उरण पोलीसांना मिळताच उरण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी खुशीराम गजानन ठाकूर याला ताब्यात घेतले असून खुशीराम ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!