• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मोटरसायकल अपघातात एक ठार एक जखमी

ByEditor

Jun 10, 2024

मिलिंद माने
महाड :
महाड शहरानजीक गांधारपाले गावाच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका मोटरसायकलला झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील महाड तालुक्यातील गांधारपाले गावाजवळ दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास राहुल गंगाराम रेवाळे (वय – ३०, मुळ रा. दापोली, सध्या रा. मुंबई गोरेगाव) आणि आकाश प्रकाश पवार (वय – २८, मुळ रा. विन्हेरे, सध्या रा. मुंबई गोरेगाव) हे दोघेजण मोटरसायकल क्रमांक एमएच ०४ एमबी ९२१५ याने मुंबई ते विन्हेरे असा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत होते. ४ वाजण्याच्या सुमारास महाड शहरानजीक असलेल्या गांधारपाले या गावहद्दीत आल्यानंतर चालक राहुल रेवाळे याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी स्लिप होऊन डिवायडरवर आपटली. रेवाळे याच्या डोक्याला जबरी मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेला आकाश पवार गंभीर जखमी झाला. जखमीवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद महाड शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताचे वृत्त समजतात महाशक्ती ॲम्बुलन्सचे अनिल चव्हाण यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन तातडीने जखमी व्यक्तीला महाड ग्रामीण रुग्णालयात पोलिसांच्या सहाय्याने दाखल करण्यात मदत केली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!