• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिलठण सरपंचांचा एका आठवड्यात यू टर्न; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का

ByEditor

Jun 11, 2024

गणेश पवार
कर्जत :
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणारे चिलठण ग्रामपंचायत सरपंचांची एका आठवड्यात घरवापसी झाली आहे. दरम्यान, या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे.

रविवार, दि. २ जून रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिलठणचे सरपंच मिनेश गायकर यांचा शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता. हा पक्षप्रवेश होऊन एक आठवडा उलटत नाही तोच पुन्हा रविवार, दि. ९ जून रोजी सरपंच मिनेश गायकर यांची शिवसेना शिंदे गटात घरवापसी झाली आहे. कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे. आमदार महेंद्र थोरवे हे कसलेले राजकारणी म्हणून पुढे येत आहेत आणि त्यामुळेच सरपंच मिनेश गायकर यांना उपरती होत त्यांनी हाताचे घड्याळ एका आठवड्यात काढून पुन्हा शिवबंधन बांधले आहे. एकूणच हा पक्षप्रवेश सोहळा विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. तर या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

यावेळी खालापूर तालुकाप्रमुख संदेश पाटील, उद्योग आघाडी तालुकाप्रमुख शशिकांत मोरे, मनोहर थोरवे, युवासेना तालुका प्रमुख रोहित विचारे, जिल्हा परिषद विभागप्रमुख राजू ढोकळे, पंचायत समिती संघटक विनायक गायकर, उपसरपंच परशुराम गायकर, शाखाप्रमुख समीर पाटील आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!