• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण तालुका मराठा समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग शिंदे यांची बिनविरोध निवड

ByEditor

Jun 11, 2024

विनायक पाटील
पेण :
पेण तालुका मराठा समाजाच्या अध्यक्षपदी पांडुरंग तुकाराम शिंदे उर्फ पी. टी. शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पेण तालुका मराठा समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा समाजाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडली. यामध्ये कै. प्रदीप विठ्ठल चव्हाण यांच्या निधनानंतर पेण तालुका मराठा समाजाच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदी पांडुरंग तुकाराम (पी. टी) शिंदे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
मांगरुळ गावचे पी. टी. शिंदे हे उच्चशिक्षित असून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे येथे सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. स्वतःकडे समाजाचे किंवा राजकीय असे कोणतेही पद नसताना स्वर्गीय माजी राज्यमंत्री भाई मोहनराव पाटील यांचे तसेच समाजातील ज्येष्ठ मंडळींचे असलेले मराठा समाज भवनाच्या वास्तूचे स्वप्न तरुण मंडळींच्या साथीने, सर्व समाज बांधवांकडून प्राप्त झालेल्या देणगीचे योग्य नियोजन करून व स्वतः तन मन धन अर्पण करून पुर्ण केले.

सर्व मराठा समाज बांधवांशी असलेला जनसंपर्क, समाजावरती असलेल प्रेम, समाजास विशिष्ट उंचीवर नेण्याची उद्दिष्टे पाहून संपूर्ण पेण तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी तसेच सर्वसामान्य समाजबांधवांनी पी. टी. शिंदे यांची पेण तालुका मराठा समाजाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, चिंतामण महाडिक, भाऊ एरणकर, बापु दळवी, आण्णा पार्टे, राजेंद्र वारकर, प्रकाश झावरे, मानकर, शंकर मानकवळे, रघुनाथ बोरेकर, मंगेश दळवी, शिवाजी पाटील, शिरीष मानकवळे, महिला अध्यक्षा सुगंधा गोडीवले, शहर अध्यक्ष प्रविण बैकर, विशाल साजेकर, कमलाकर साळुंके, सचिन पवार, श्रीकांत जाधव, मनीष देशमुख, संतोष जाधव तसेच समाजाचे सर्व मंडळी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाच्यावतीने सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

हे हि पहा….

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!