• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित

ByEditor

Jun 13, 2024

विद्युत वाहक तारांची व पोलांची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने समस्या

अनंत नारंगीकर
उरण :
महावितरण कंपनीकडून विद्युत वाहक तारांची व पोलांची वेळच्या वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने उरण तालुक्यातील रहिवाशांना करण्यात येत असलेला विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

उरण शहर, तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत हद्दीतील गावे तसेच छोटेमोठे व्यवसायिक यांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांच्याकडून मागणी करुनही सदर हद्दीतील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारांची व लोखंडी पोलांची वेळचे वेळी देखभाल दुरुस्ती होत नसल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याच्या घटनेत वाढ होत आहे. त्यातच महावितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणामुळे विद्युत वाहक तारा पडून मुक्या प्राण्यांबरोबर रहिवाशांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.

महावितरण कंपनीच्या अभियंत्यांनी उरण तालुक्यातील जीर्ण झालेल्या विद्युत वाहक तारा व सडलेल्या लोखंडी पोलांची देखभाल व दुरूस्तीची कामे तातडीने हाती घ्यावी अशी मागणी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी केली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!