• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या अर्चना भोसले तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान शिद यांची निवड

ByEditor

Jun 14, 2024

या निवडणूकीमध्ये शिवसेनेचे मनोज खांडेकर ठरले किंगमेकर

किरण लाड
नागोठणे :
नागोठणे विभागातील श्रीमंत समजली जाणारी ऐनघर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना सचिन भोसले यांची तर उपसरपंचपदी भाजपचे भगवान शिद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे रोहा उप तालुकाप्रमुख मनोज खांडेकर यांची किंगमेकरची भुमिका महत्वाची ठरली आहे.

नागोठणे विभागातील आर्थिकदृष्टीने सक्षम असणारी ऐनघर ग्रामपंचायतीच्या शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सरपंच कलावती कोकळे व माजी उपसरपंच किशोर नावले यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर दि. 13 जुन रोजी ऐनघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तथा निवडणूक अधिकारी गोविंद शिद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. या निवडणूक प्रक्रियाच्या वेळी मनोहर सुटे, विनोद निरगुडे, प्रकाश डोबले, भगवान शिद, तर महिला सदस्या अर्चना भोसले, सुषमा वाघमारे, प्रज्वली भोईर, सुवर्णा शिद, वैदही इंदुलकर, कल्याणी मोहिते, नकीबाई भोसले असे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित होते. ऐनघर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अर्चना भोसले तर उपसरपंच पदासाठी भगवान शिद यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2.30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिद यांनी केली. यावेळी उपस्थित कार्यकर्ते नागरिकांनी एकच जल्लोष केला. ऐनघर ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना सचिन भोसले या प्रभाग क्रं. 3 बाळसई गावातुन निवडुन आल्या आहेत. ऐनघर ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका उप तालुकाप्रमुख मनोज खांडेकर, वरिष्ठ ग्रामपंचायत सदस्य मनोहर सुटे यांच्या पुढाकाराने विशेष मेहनत घेण्यात आली.

या निवडणूकीच्या वेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे, उप तालुकाप्रमुख मनोज खांडेकर, विभागप्रमुख प्रविण ताडकर,शिवसेनेचे नागोठणे शहर प्रमुख अमित खामकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले, रोहिदास लाड, संजय कणघरे, निवृत्ती जंगले, निवास पवार, सुरेश वाघमारे, विजय भोसले, नामदेव वाघमारे, नारायण मोहिते, जगन कोकळे, महेश शिरसे, मंदार कोतवाल, लक्ष्मण मोहिते, आत्माराम खामकर, राम खामकर, जयेश जाधव, भारत सुटे, गणेश सुटे यांच्यासह विभागातील महायुतीचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!