• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

९ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी आवळल्या मुसक्या

ByEditor

Jun 15, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
चिरनेर येथील ९ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांच्या या धाडसी कारवाईबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते-पाटील व सदर मूलीला अपहरणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भरत जाधव या आदिवासी बांधवांचे सामाजिक कार्यकर्त्या अलका मोकल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आभार व्यक्त केले आहेत.

चिरनेरमध्ये मंगळवारी (दि. ११) ९ वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, भरत राम जाधव या आदिवासी वाटसरुने दाखवलेली सतर्कता आणि ९ वर्षाच्या मुलीच्या प्रसंगावधान व धाडसाने अज्ञात अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन आपली सुटका करून घेतल्याची घटना घडली होती. याप्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उरण पोलिसांनी तातडीने भरत जाधव व सदर मूलीच्या वर्णनातून आणि सीसीटिव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर एका स्वीप्ट गाडीतून आलेल्या राजेंद्र गोंधळी (वय ३५, रा. बामणडोंगरी-पनवेल) याने मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे.

याआधीही त्याने नवी मुंबई हद्दीत अशाच प्रकारचा गुन्हा केला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या सीसीटीव्हीच्या आधारावर मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते-पाटील यांनी दिली. तसेच अपहरणकर्ता इसम हा आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कोणकोणत्या अनधिकृत धाब्यावर दारू पिण्यासाठी बसला होता की नाही याचाही तपास पोलीस यंत्रणा घेत आहे.

चिरनेर गावातील एका ९ वर्षांच्या मूलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भरत जाधव यांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न असफल झाला आहे. तसेच उरण पोलीसांनी तातडीने अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत असून अशा घटना घडू नये यासाठी पालकांनी सतर्क राहावे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या इसमाला कठोर शिक्षा व्हावी

-अलका महेंद्र मोकल/प्रणिता जयप्रकाश पाटील
सामाजिक कार्यकर्त्या

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!