• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमधील प्रितम पाटील यांचे अवयवदान; ६ जणांना जीवदान

ByEditor

Jun 19, 2024

घन:श्याम कडू
उरण :
उरण येथे राहणारे ५१ वर्षीय प्रितेश राजाराम पाटील यांना हायपरटेन्शनचा त्रास असल्याने १५ जून रोजी त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना १८ जून रोजी ब्रेनडेड घोषित केले. त्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय तत्काळ घेतला. अवयवदानानंतर यकृत, किडनी, फुफ्फुस, कॉर्निया दान केल्यामुळे ६ जणांना जीवनदान मिळाले. त्यांचे यकृत अपोलो हॉस्पिटलमध्ये रूग्णाला प्रत्यारोपण केले. त्याचे यकृत गिरगावमधील एचआर रिलायन्समध्ये ग्रीन कॉरिडॉरने पाठविण्यात आले.

प्रितेश यांच्या वडिलांनी आणि पत्नीने ब्रेनडेड झाल्यानंतर अवयवदान करण्यास संमती दिली. प्रितेशही अवयवदानाबद्दल जागरूक होते. नेहमीच अवयवदानाबद्दल चर्चा करत असल्याने अवयवदान करून इतरांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. हृदय कमकुवत झाल्याने दान करता आले नाही, याचे वाईट वाटते, असे प्रितेशचे भाऊ सागर पाटील यांनी सांगितले.

आज बुधवारी (दि. १९) रोजी प्रितम यांच्यावर नागाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भार्गवी व विवाहित सुहानी या दोन्ही मुलींनी वडिलांच्या चितेला अग्नी दिला. उरण परिसरातील बहुधा ही एकमेव घटना असावी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!