• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नागोठणे संत सेवा मंडळ अध्यक्षपदी शैलेश रावकर

ByEditor

Jun 22, 2024

प्रतिनिधी
नागोठणे :
येथील संत सेवा मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश रावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शुक्रवार, दि. २१ जून रोजी संत सेवा मंडळाच्या झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी संत सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संत सेवा मंडळाचे मावळते अध्यक्ष रतन हेंडे यांनी आपल्या कार्यकाळाची ५ वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर नवीन अध्यक्षांसह नवीन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन शुक्रवार, दि. २१ जून २०२४ रोजी येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते शैलेश रावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मंडळाच्या उपाध्यक्ष पदी महेश वाघमारे, सचिव पदी अनिल नागोठणेकर, सह सचिव पदी राजू नाकते, खजिनदार पदी जनार्दन सकपाळ, सह खजिनदार पदी हरेश शिर्के यांची निवड करण्यात आली. मंडळाचे सदस्य पदी चंद्रकांत ताडकर, विजय नागोठणेकर, हितेश भोय, कैलास परदेशी, प्रणव रावकर, ज्ञानेश्वर साळुंखे, रोहिदास हातनोलकर यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष शैलेश रावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मंडळाच्यावतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!