• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कै. प्रशांतभाऊ पाटील यांच्या शोकसभेचे आयोजन

ByEditor

Jun 22, 2024

विठ्ठल म‌मताबादे
उरण :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांचे २० जून २०२४ रोजी हदयविकाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. प्रशांतभाऊ पाटील यांचे कुटुंब, नातेवाईक व मित्र परिवारावरही शोककळा पसरली आहे.

प्रशांत पाटील यांचे असंख्य चाहते समर्थक नवी मुंबई, मुंबई, रायगड जिल्हयात मोठया प्रमाणात आहेत. या सर्वांना प्रशांतभाऊंच्या जाण्याने खूप मोठा धक्का बसला आहे. प्रशांतभाऊ हे मनमिळावू, प्रेमळ, सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. त्यांच्याप्रती आदरभाव व प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रशांत भाऊ पाटील यांच्या कार्याला, विचारांना, आठवणींना उजाळा देऊन त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्याच्या दृष्टीकोनातून गुरुवार, दि. २७ जून २०२४ रोजी सायं. ४ वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टाऊनशिप उरण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!