अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील लोणारे येथे एक दुःखद घटना घडली. पायल मनिष म्हात्रे (वय३०) या विवाहित महिलेचे बुधवार, दि. १९ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. याबाबत गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मूळची बहिरोळे-बेलवली येथील माहेरवाशीण असलेल्या व प्रकाश पुरो यांची कन्या असलेल्या पायल म्हात्रे यांचे चार वर्षांपूर्वी लोणारे येथील मनिष म्हात्रे यांच्या सोबत लग्न झाले होते. बुधवार, दि. १९ जून रोजी लोणारे येथील घरी असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना त्वरित अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात ३ वर्षीय मुलगी, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत नातेवाईक, पंचक्रोशीतील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.