• Thu. Jun 26th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

थेरोंडा समुद्रकिनारी सापडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमाराचा मृतदेह

ByEditor

Jun 22, 2024

अमुलकुमार जैन
अलिबाग :
रायगड जिल्ह्यातील थेरोंडा समुद्रकिनारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार किशोर महादेव चोडणेकर (५५) यांचा मृतदेह सापडला असून सदर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कीरविले यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळाशी येथील किशोर महादेव चोडणेकर हे ८ जून रोजी मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (१४) आणि खलाशी धोंडीराज परब (५५ रा. तारकर्ली) यांसह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. सदर मच्छीमार सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास होडी उलटली. यात तिघेजण समुद्रात बुडाले होते. लावण्य हा पोहत किनाऱ्यावर आला होता. तर बेपत्ता धोंडीराज यांचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला होता. मात्र, किशोर यांचा मृतदेह तब्बल बारा दिवसांनी म्हणजे २० जून २०२४ रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अलिबाग तालुक्यातील थेरोंडा बाजारपेठ येथील समुद्रकिनारी सापडला असल्याची माहिती रेवदंडा पोलिस पाटील स्वप्नील पांडुरंग तांबडकर यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यास दिली असता रेवदंडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कीरविले यांनी घटनस्थळाला भेट दिली. सदर मृतदेह संपुर्ण कुजलेल्या अवस्थेत अंदाजे वय-४० वर्षे, बांधामध्यम, उंची ५ फुट, चॉकलेटी हाफ पॅन्ट, पिवळया रंगाचा टिर्शट त्याला हिरव्या रंगाच्या बाहया टिर्शटच्या पाठी मागे “साईभाक्त श्री दिपक (बाबा) हांडे नगरसेवक, मोहन वामन अध्यक्ष पालखी सह पदयात्रा सोहळा” असे मराठीत लिहलेले व समोरील बाजुस “भटवाडी साईदर्शान सेवा संस्था, घाटकोपर मुंबई” असे मराठीत लिहिले होते. सदर अनोळखी मृतदेह सापडला असल्याची माहिती वरिष्ठ यांच्या सूचनेनुसार वर्णनानुसार सोशल मीडिया तसेच पोलिस विभागामार्फत राज्यातील सर्व पोलिस स्टेशनला देण्यात आली.

सदर मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर ‘घाटकोपर भटवाडी साईदर्शन’ असा उल्लेख असल्याने हा फोटो घाटकोपरमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर हा मृतदेह चोडणेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मयत किशोर चोडणेकर यांचे नातेवाईक हे २१ जून रोजी रेवदंडा पोलिस स्टेशन येथे आले आणि सदर मृतदेहाची ओळख पटवून सदर मृतदेह हा किशोर चोडणेकर याचा असल्याचे सांगितले. रेवदंडा पोलिसांनी सदर मृतदेह २१ जून रोजी रात्री उशिरा नातेवाईक यांच्या ताब्यात दिला आणि नातेवाईक हे मृतदेह घेवुन गेले असल्याची माहिती रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कीरविले यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!