• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सतत पाठदुखी होत असल्यास सावध व्हा! ‘ही’ 5 कारणे असू शकतात

ByEditor

Jun 28, 2024

रायगड जनोदय ऑनलाइन : चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या पाठदुखीची समस्या अनेकांना सतावत असल्याचे दिसून येते. जर तुम्हालाही हा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कमजोर हाडे आणि मांसपेशींवर दाब पडल्याने पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. पाठदुखीची समस्या कमी प्रमाणात असताना वजनदार वस्तू उचलल्यास, खेळताना दुखापत झाल्यास हे दुखणे आणखी वाढू शकते. पाठदुखीची समस्या वाढण्याची प्रमुख कारणे जाणून घेवूयात.

१. मज्जातंतूचे दुखणे
मज्जातंतूचे दुखणे पाठीच्या कण्याच्या डिस्कला दुखापत झाल्यास होऊ शकते. दुखावलेल्या पाठीच्या कण्याच्या डिस्कचा दाब मज्जातंतूवर पडल्याने नितंबापासून पायापर्यंत वेदना होतात. यास सायटिक नर्व्ह पेन असे म्हणतात.

२. बैठे काम, वजनदार वस्तू उचलणे
आठ ते दहा तास बैठे काम करणारांना पाठीचे दुखणे होऊ शकते. यासाठी अधुनमधुन फेरफटका मारण्याची गरज असते. तसेच वजनदार वस्तू उचलल्यानेही पाठदुखी होऊ शकते.

३. जास्त आणि चुकीच्या पद्धतीने व्यायाम
शरीराला व्यायामासोबतच आरामाचीही गरज असते. जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर आरामही केला पाहिजे. सतत व्यायाम करणे आणि अजिबात आराम न केल्यास पाठदुखी, मांसपेशींना दुखापत होऊ शकते. तसेच चुकीच्या पद्धतीने व्यायाम केल्यास पाठदुखी होऊ शकते.

४. चुकीच्या पद्धतीने बसणे
जर तुम्ही सतत चुकीच्या पद्धतीने बसत असाल तर त्याचा प्रभाव पाठीच्या कण्यावर पडतो. यामुळे पाठदुखी होऊ शकते. यासाठी पाठीच्या वरच्या आणि खालच्या भागाला आधार मिळेल असे बसा. पायांना सुद्धा आधार म्हणून स्टूलचा वापर करा.

५. जास्त वजन, लठ्ठपणा
जास्त वजन, चुकीची जीवनशैली आणि लठ्ठपणा यामुळे कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो.

हे आहेत उपाय

१. प्रथम आपले वजन कमी करा.
२. गरम पाण्याच्या पिशवी शेक द्या, अथवा कमरेवर ठेवा.
३. तज्ज्ञ प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करा.
४. नियमित योगा करा.
५. पाठदुखी दूर ठेवण्यासाठी नियमित मॉलिश करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!