• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

आंबेनळी घाटामध्ये कोसळली दरड

ByEditor

Jul 9, 2023

देवेंद्र दरेकर
पोलादपूर :
आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून घाटामध्ये रविवारी पुन्हा दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

पावसाच्या तुफानी माऱ्याने रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गे महाबळेश्वर-साताऱ्याला जोडणारा व वाहतुकीसाठी मुख्य मानला जाणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये वारंवार कोसळत असलेल्या दरडीमुळे घाट प्रशासनाच्यावतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील काही वाहने घाटामधून प्रवास करत असून आज शनिवारी दुपारच्या सुमारास आंबेनळी घाटामध्ये चिरेखिंड गावाच्या नजीक मोठी दरड कोसळली आहे. त्यानंतर तातडीने प्रशासनाने यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचे काम सुरू केले असून घाटामध्ये दरडीचा धोका मात्र अद्याप कायम आहे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!