• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे दातृत्व! अपघात झालेल्या उमेश दुर्गे याला केली आर्थिक मदत

ByEditor

Jul 9, 2023

विठ्ठल ममताबादे
उरण :
रायगड जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय कार्य सर्वांनाच माहीत आहे. त्याचा आणखीन एक प्रत्यय आज पहायला मिळाला. उरण विधानसभा मतदार संघातील खालापूर तालुक्यातील धारणी येथील उमेश दुर्गे या गरीब तरुणाचा ह्युंडाई मुव्हीज कंपनी रसायनी येथे अपघात झाला होता. अतिशय गरीब परिस्थिती असल्यामुळे त्याच्या परिवाराला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. मेडिकल ट्रीटमेंट साठी पैशाची व्यवस्था होत नव्हती, अशा वेळी गरीब व गरजूंच्या मदतीला नेहमीच धावून येणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी त्यांच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांना पंचवीस हजार रुपये मदत करत त्यांच्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

सदर अर्थिक मदत ही शनिवार दिनांक ८ जुलै २०२३ रोजी त्याच्या राहत्या घरी जाऊन स्वतः माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उमेश दुर्गे यांच्या हाती सुपूर्द केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोतीरामशेठ ठोंबरे, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमशेठ भोईर, उपसरपंच हरीश दुर्गे, अनंत पाटील, गजानन ठाकूर, भगवान जाधव, संतोष जाधव, कालूराम दुर्गे, नंदू दुर्गे, अरविंद बडेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!