सलीम शेख
माणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड वतीने दि. ४ जुलै २०२४ रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांचे कार्यालयासमोर राजेश सुर्वे राज्य अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली आयोजित करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र त्याअगोदर रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या या प्रलंबित समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी दि.१जुलै २०२४ रोजी शिक्षण अधिकारी प्राथमिक रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी शिक्षक परिषद पदाधिकारी यांना बोलाविले होते. त्याप्रमाणे राजेश सुर्वे राज्य अध्यक्ष यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगडच्या पदाधिकारी यांनी रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
केंद्र प्रमुख रिक्त पदे पदविधर पात्र वेतनश्रेणी घेणारे शिक्षक यांची सेवाज्येष्ठता नुसार १/३ याप्रमाणे येत्या १० दिवसांत प्रसिद्ध करून नेमणूक करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे फाईल सादर करण्यात आली,रिक्त कनिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण पदे आकृती बंध मंजूर झाल्यानंतर भरली जातील, रिक्त पदे मुख्याध्यापक पदे वेतन संरक्षण मिळालेल्या मुख्याध्यापक शिक्षकांना लवकरच नेमणूका दिल्या जातील,विज्ञान गणित घेऊन पदविधर झालेल्या प्राथमिक शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून नेमणूका दिल्या जातील ५ विषय शिक्षक नेमणूक झालेल्या शिक्षकांचे उपशिक्षकपदी नेमणूक होण्याचे दिलेले प्रस्ताव त्वरीत मंजूर केले जातील, प्रलंबित वैद्यकीय थकीत बिले निधी उपलब्ध झाल्यावर लगेच दिले जाईल, पदवीधर पात्र शिक्षक/पदो मुख्याध्यापक/केंद्र प्रमुख पात्र शिक्षकांना निवड श्रेष्ठ लवकरच मंजूर होईल, आंतरजिल्हा बदलीने रायगड जिल्हा परिषदेत सन २००६पूर्वी बदलून आलेल्या प्राथमिक शिक्षकांना एक वेतनवाढ देण्याचे प्रस्ताव तालुक्यातून मागविले जातील, प्रलंबित वैद्यकीय फाईल राजिप फंड प्रकरणे उच्च शिक्षण परवानगी नावात बदल प्रकरणे मंजूर केली जातील, रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची सकाळच्या शाळेची वेळ सकाळी ९ ते १ करण्यात यावी ही मागणी करण्यात आली.
यावेळी शिक्षण अधिकारी प्राथमिक पुनिता गुरव, प्रशासन अधिकारी कवीतके, कनिष्ठ प्रशासन अधिकारी जाधव, संबंधित विषयाचे लेखनिक राजिप अलिबाग, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, जिल्हा अध्यक्ष विजय पवार, जिल्हा कार्यवाह गजानन देवकर, जिल्हा नेते उदय गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष जगदिश चवरकर, नेते सुशील वाघमारे, वैभव पिंगळे, मुरूड तालुका अध्यक्ष राजू नाईक, मुरूड तालुका कार्यवाह देवानंद गोगर, महाड तालुका अध्यक्ष सचिन खोपडे, पनवेल तालुका अध्यक्ष सुनिल साळवी, पेण तालुका अध्यक्ष महेंद्र गायकवाड, महाड तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब बारगजे, पेण तालुका कार्यवाह विजय मेस्त्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.