८१ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले
सलीम शेख
माणगाव : ठेकेदाराचे बील अदा करण्यासाठी त्याच्याकडून लाचेची मागणी करत ती स्वीकारत असताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून वित्त अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले .
सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार सागर सुरेश जाधव (वय ३२, रा. लोणेरे) यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाच्या पदविका विभागातील सभागृह नूतनीकरणाचे काम केले होते. या कामाचे बील मंजूर करून ते अदा करण्यासाठी विद्यापिठातील वित्त अधिकारी ओंकार रामचंद्र आंबपकर (वय ५५ , रा. आनंदनगर सोसायटी लोणेरे) याने सागर जाधव यांच्याकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदार जाधव यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांचेकडे केलेल्या तक्रारीनुसार काल शुक्रवारी सायं. ४वा लाचलुचपत विभागाने सापळा रचून आंबपकर याला जाधव यांच्याकडून लाचेची रक्कम रू. ८१ हजार स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक ठाणे परिक्षेत्र सुनिल लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच उप अधीक्षक शशिकांत पाडावे, सहा. फौजदार विनोद जाधव, सहा. फौजदार अरुण करकरे, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार सागर पाटील यांनी ही कारवाई केली.