विनायक पाटील
पेण : गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यात अग्रेसर असलेल्या आणि सामजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानने सांस्कृतीक कार्यात देखील सहभाग घेऊन त्यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठू माऊलीच्या गीतांचा सुरेल कार्यक्रम पेण शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय सभागृहात बुधवारी 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे.

रायगड भुषण पुरस्काराने सन्मानित गायक संतोष पाटील यांच्या सुमधुर आवाजात “विठू तरंग” नावाने अभंगाची सायंकाळ विठू माउली चरणी अर्पण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सदर कार्यक्रम हा विनामूल्य ठेवण्यात आला असुन या विठू तरंगांचा पेण शहरासह तालुक्यातील भाविकांनी आणि रसिक प्रेक्षकांनी आनंद लुटावा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष समीर म्हात्रे यांनी केले आहे.