• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे जिल्ह्यातील प्रशिक्षक, पंच व स्कोअरर्ससाठी संवाद शिबिराचे आयोजन

ByEditor

Jul 6, 2024

क्रीडा प्रतिनिधी
रायगड :
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने बुधवार, दि. १० जुलै रोजी खोपोली येथील महाराजा बँक्वेट हॉल येथे सकाळी १०.३० वाजता रायगड जिल्ह्यातील सर्व अकॅडमी,क्लब व संघांच्या प्रशिक्षक आणि प्रतिनिधी यांच्या सोबत संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या शिबिरामध्ये २०२४/२५ च्या क्रिकेट हंगामात होणाऱ्या विविध क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, स्पर्धेची रूपरेषा व नियोजन करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे, विविध वयोगटातील स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व अकॅडमी, क्लब व संघ यांचा सहभाग निश्चित करणे, जिल्ह्यातील सर्व खेळाडूंचे राजिस्ट्रेशन करणे व त्यांना आरडीसीए मार्फत ओळखपत्र देण्याविषयी माहिती देणे, सर्व वयोगटातील होणाऱ्या स्पर्धेसाठी नियम-नियमावली तयार करणे, मुलींच्या क्रिकेट स्पर्धांचे नियोजन करणे, महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशन मार्फत घेण्यात येणाऱ्या निमंत्रित स्पर्धांपैकी काही सामने रायगड जिल्ह्यात घेण्याबाबत माहिती देणे, रायगड जिल्ह्यात क्रिकेट वाढवण्यासाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन व चर्चा ह्या शिबिरामध्ये होणार आहे. दुपारी १२.३० वाजता जिल्ह्यातील पंच व स्कोअरर्स यांच्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमार्फत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पंच व स्कोअरर्सच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामधते बीसीसीआयचे पंच व स्कोअरर्स यांच्यामार्फत मार्गदर्शन होणार आहे. तरी सदरच्या संवाद शिबिरासाठी प्रत्येक अकॅडमी, क्लब व संघांच्या एका प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदिप नाईक यांनी केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!