• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चिरनेर पंचक्रोशीतील होतकरू तरुणांनी दिला पर्यावरण प्रेमाचा संदेश

ByEditor

Jul 6, 2024

अनंत नारंगीकर
उरण :
सेकंडरी स्कूल चिरनेर दहावी २०१०-११ च्या ग्रुपमधील विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी एका छताखाली येऊन जयेश खारपाटील यांच्या फार्म हाऊसवर पावसाळी गेट टू गेदरचे आयोजन शुक्रवारी (दि. ५) केले होते. यावेळी चिरनेर, कळंबुसरे, मोठे भोम पंचक्रोशीतील होतकरू तरुणांनी एकमेकांना पर्यावरण प्रेमाचा संदेश देत आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेतील शिक्षण पुर्ण झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरीनिमित्ताने बाहेरगावी जात असतो. त्यामुळे बालपणीचे सवंगडी, मित्र हे एका छताखाली केव्हा येत नाहीत. अशा बालपणीच्या मित्रांना कळत नकळत एका छताखाली आणण्याचे काम हे चिरनेर गावातील जागृत महागणपती देवस्थान हे करत आहे. चिरनेर येरहील शाळेतील २०१०-११ या वर्षात इयत्ता दहावीच्या वर्षातील विखुरलेल्या विद्यार्थ्यांना एका छत्राखाली आणण्याचे काम हे शुक्रवारी डोंगर दरीत वसलेल्या खारपाटील फार्म हाऊसवर केले. यावेळी बालपणीच्या मित्रांनी एकमेकांच्या जडणघडणीतील अनुभव एकमेकांच्या समोर शेअर करीत वृक्षारोपण केले. तसेच यापुढील प्रत्येक गेट टू गेदर आणि सहलीत किमान एकतरी सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवायचा असा संकल्प करीत, ही दोस्ती तुटायची नाही असे या माध्यमांतून सुचित करत स्नेहभोजनाचा आनंद लुटत एकमेकांना निरोप दिला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!