घन:श्याम कडू
उरण : उरणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. याबाबत कल्पना देऊनही ठोस उपाययोजना होत नाही. त्याच्या निषेधार्थ उरण शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज वीज कार्यालयावर धडक देत जाब विचारला. यावेळी पदाधिकारी व वीज अधिकारी यांच्यात चर्चा होऊन उपाययोजना करण्याचे अधिकारी वर्गानी मान्य केले.

उरण परिसरात विजेचा लपंडाव व कर्मचारी वर्गाचा मुजोरपणा याचा त्रास येथील जनतेला सहन करावा लागत होता. मात्र, वीज बिल भरमसाठ येत आहेत. त्याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनही वीज मंडळाचे अधिकारी दखल घेत नव्हते, यामुळे जनतेत वीज अधिकाऱ्यांविरोधात जनतेत संतापाची लाट पसरली होती. याची दखल उरण शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षानी घेत जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरण वीज कार्यालयावर धडक देत याचा जाब विचारण्यात आला. यावेळी उरण शहरातील यार्ड व इतर आर्थिक लागेबांधे असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा आरोप करीत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी अधिकारी वर्गावर करण्यात आला. तसेच पाऊस न पडताही दिवसांतून अनेकवेळा वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी पनवेल शहर विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय सातपुते व उरण उपविभागीय अधिकारी विजय सोनावले यांनी आपण यामध्ये जातीने लक्ष घालून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाला दिले.
या प्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख दीपक भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, माजी शहरप्रमुख महेंद्र पाटील, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के. एम. घरत, रुपेश पाटील, अमित भगत, उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका (शहर) सुजाता गायकवाड, तालुका संघटक (ग्रामीण) भावना म्हात्रे, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संपर्क संघटिका प्रणिता म्हात्रे, शहर संघटिका वीणा तळरेजा, शहर संपर्क संघटिका वंदना पवार, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, शाखा संघटिका हसिमा सरदार, विभागप्रमुख एस. के. पूरो, संदेश पाटील, राजू म्हात्रे, युवासेनेचे उरण तालुका अधिकारी करण पाटील, शहराधिकारी आशिष गोवारी, पूर्व विभाग अधिकारी अमित म्हात्रे, उपविभाग अधिकारी सिद्धेश म्हात्रे, वाहतूक सेनेचे नवघर अध्यक्ष संतोष पाटील, ग्राहक संरक्षण कक्षाचे शहराध्यक्ष संदीप जाधव, शाखाप्रमुख अजय म्हात्रे, शेखर पडते, संदीप पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.