• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

खारपाडा येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ByEditor

Jul 22, 2024

युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांचा स्तुत्य उपक्रम

विनायक पाटील
पेण :
युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते कैलास घरत यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील, रायगड जिल्हा डी. वाय. फाउंडेशनचे अध्यक्ष यश घरत, अलिबाग तालुका प्रमुख धीरज माळवी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ट्रस्टचे सदस्य रवींद्र चव्हाण यांना देण्यात येऊन त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सदस्य श्रीकांत जाधव, आशिष कोचरगावकर, सुचित्रा समेळ, मार्गदर्शक चंद्रकांत घरत, सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड, कविता गावंड, महिला अध्यक्षा मयुरी घरत, कीर्ती देसले, ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा विद्यमान सदस्या अनिता वाघे, संगीता वाघे, विजय ठाकूर, रमाकांत देसले, बळीराम घरत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सर्वेसर्वा कैलास घरत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. हेमंत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

यावेळी मंगेश कांबळे यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा या शाळेतील इयत्ता पाचवीमधील पेण तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत पहिला आलेल्या कु. प्रियांश चंद्रकांत घरत याचा चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. एम.एस.टी. स्कूल कासारभटमध्ये 91% गुण मिळवीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पायल रमाकांत देसले हीचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत, ट्रस्टचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. भानूबेन प्रवीण शहा माध्यमिक विद्यामंदिर तारामध्ये 82.60% गुण मिळवीत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. जिज्ञासा नरेश पाटील हिचा शिवतेज युवा फाउंडेशन रायगड जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला. तसेच माध्यमिक विद्यामंदिर खारपाडामध्ये 79.60% गुण मिळवीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. ईशिका विजय पाटील हिचा युवा फ्रेंडस सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास घरत यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, नरेश पाटील, यश पाटील, अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला पालक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. या स्तुत्य अशा उपक्रमाचे खारपाडा आपटा पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत होत आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात समाज्याच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी, आदिवासी मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी पालक सुसंवाद कार्यशाळा, व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा, वक्तृत्व संभाषण कार्यशाळा, शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला, विद्यार्थी चर्चासत्रे, गडकोट संवर्धन उपक्रम, करियर गाईडंस् असे अनेक नवनवीन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही कैलास घरत यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!