रायगड : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. नदी पात्रात पाण्याची वाढ झाल्याने नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.