नवी मुंबई : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर ढिगाऱ्याखाली दोघे अडकले असून इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाळी अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

तीन मजल्यांची इमारत कोसळल्यानं संपूर्ण शहर हादरलं आहे. नवी मुंबईतील शहाबाज गावातील 3 मजल्यांची बिल्डिंग पत्त्यासारखी कोसळली आहे. बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस 3 मजली इमारत पहाटे कोसळली. यामध्ये 2 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत होती. दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

बिल्डिंगला अगोदर हादरे बसले त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले मात्र दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती समजत आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन अग्निशमन दलाचे जवान पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शी आणि इमारतीतील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास बिल्डिंग कोसळली. पत्त्यासारखी बिल्डिंग जमिनदोस्त झाल्याचं पाहायला मिळाली. बिल्डिंगला अगोदर हादरे बसले, त्यामुळे इमारतीमधील सर्वच नागरिक बाहेर पडले. मात्र, दोन नागरिक यामध्ये अडकल्याची माहिती मिळाली.
दुर्घटनेची बातमी मिळताच, पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.