• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ब्लाऊज वेळेवर न शिवणं पडलं महागात, टेलरला 15 हजारांचा दणका, अन् मोफत…

ByEditor

Jul 31, 2024

धाराशिव : चांगलं कापड घेतलं की ते नीट शिवून मिळेल की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर मिळेल का ही चिंता अखिल महिलावर्गाला सतावते. पण टेलर काही वेळेवर कपडे देतील याची शाश्वती नाही. अशीच काहीशी घटना धाराशिव मध्ये घडली. ॲडव्हान्स पैसे देऊनही वेळेत ब्लाऊज शिवून न दिल्याने एका टेलरला मोठा दणका बसला

टेलरकडे कपडे , ब्लाऊज शिवायला टाकणे आणि ते वेळेवर न मिळणे ही समस्त महिलावर्गाची समस्या असते. एखाद्या वेळेसच असं होतं की टेलर उत्तम शिलाई आणि तेही वेळेवर करून देतो. त्यामुळे चांगलं कापड घेतलं की ते नीट शिवून मिळेल की नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळेवर मिळेल का ही चिंता अखिल महिलावर्गाला सतावते. पण टेलर काही वेळेवर कपडे देतील याची शाश्वती नाही. अशीच काहीशी घटना धाराशिव मध्ये घडली. ॲडव्हान्स पैसे देऊनही वेळेत ब्लाऊज शिवून न दिल्याने एका टेलरला मोठा दणका बसला आहे.

तब्बल 15 हजार रुपयांचा दंड त्या महिला टेलरला भरावा लागला आणि शिक्षा म्हणून राहिलेला ब्लाऊजही मोफत शिवून द्यावा लागला. ग्राहक तक्रार निवारण मंचाने ठोठावलेल्या या शिक्षेमुळे आता तरी टेलर्स धडा शिकतील अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय झालं ?

धाराशिवमध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. यासाठी स्वाती यांनी एकूण 6 हजार 300 रुपये बिलापैकी 3 हजार रुपये ॲडव्हान्सही दिले. मात्र ॲडव्हान्स रक्कम घेऊनही नेहा संत यांनी काही स्वाती यांना वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही.

स्वाती यांनी फोन, मेसेजद्वारे अनेकवेळा संपर्क साधला, नेहा यांचा पाठपुरावा केला, मात्र त्यानंतरही ब्लाऊज काही मिळाला नाही, अखेर 28 एप्रिल 2023 रोजी स्वाती यांनी ॲड. प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. त्यानंतर ग्राहक मंचाने नेहा यांना नोटीस बजावली. मात्र त्या नोटीशीला प्रतिसाद न देता नेहा संत या सुनावणीला गैरहजर राहिल्या. त्यामुळे ग्राहक मंचाने 15 जुलै 2024 रोजी एकतर्फी आदेश पारित करीत नेहा संत यांना 10 हजार रुपये दंड तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला आहे. तसेच शिक्षा म्हणून स्वाती यांचा ब्लाऊज मोफत शिवून देण्याचे आदेशही नेहा यांना देण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!