• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

डॉ. एल. डी. पाटील यांचे दुःखद निधन

ByEditor

Aug 4, 2024

विनायक पाटील
पेण :
“जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला” या उक्तीप्रमाणे सर्वांना आवडणारे डॉक्टर एल. डी. पाटील यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने दादर गावासह पेण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे मूळ गाव दादर असून ते पेण शहरात वास्तव्यास होते.

त्यांच्याबद्दल सांगायचं तर डॉक्टरी हा पेशा स्वीकारताना अनेकांना चांगल्या प्रकारे सेवा देऊन अनेकांचे उपचार मोफत करणारे डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होते. कोरोना काळात त्यांनी खूप मदतकार्य केले असून ते गरिब, गरजू आजारी रुग्णांना नेहमीच सहकार्य करत असत. सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉक्टर एल. डी. पाटील यांचे आज रविवार, दिनांक 4 ऑगस्ट रोजी अपोलो हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार पेण स्मशानभूमीत करण्यात आले. अंत्ययात्रेस सामाजिक राजकीय शासकीय तसेच खारपाटील परिवार, डॉक्टर्स, नातेवाईक, मित्रपरिवार आणि खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांचा दशक्रिया विधी 13 ऑगस्ट रोजी पेण येथे होणार असून उत्तरकार्य 15 ऑगस्ट रोजी पेण येथील रविराज फार्म हाऊस येथे होणार आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!