• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक; गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड

ByEditor

Aug 6, 2024

पॅरिस : भारताच्या विनेश फोगटने उपांत्यपूर्व लढतीत दमदार कामगिरी केली आणि ५० किलो कुस्तीच्या फ्री स्टाइल गटात थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. युक्रेनच्या ओसाका लिवाचचे यावेळी विनेशपुढे आव्हान होते. विनेशने हा सामना ७-५ असा जिंकला आणि तिने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यामुळे आता जर विनेशने उपांत्य फेरीचा सामना जिंकला तर तिला सुवर्णपदक पटकावता येऊ शकते. त्यामुळे आता उपांत्य फेरीत विनेश कशी कामगिरी करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

भारताच्या विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकची दमदार सुरुवात केली होती. विनेशने जपानच्या युई सुसाकीवर ३-२ असा विजय मिळवला. या विजयासह विनेशने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे आता उपांत्यपूर्व फेरीत ती कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पण विनेश उपांत्य फेरीत पोहोचली आणि ती आता पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

विनेशने उपांत्यपूर्व फेरीची धमाकेदार सुरुवात केली होती. कारण विनेशने ४-० अशी दमदार आघाडी घेतली होती. त्यामुळे विनेश उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या फार जवळ होती. पण त्यानंतर ओसाकाने गुण कामवायला सुरुवात केली. त्यामुळे ही लढत चांगलीच रंगतदार सुरु होती. पण ओसोकाने त्यानंतर चार गुण मिळवले, तर विनेशला एक गुण मिळता आला. त्यामुळे विनेशकडे ५-४ अशी एका गुणांची आघाडी होती. त्यामुळे हा सामना दोलायमान अवस्थेत होता आणि कोणीही हा सामना जिंकू शकत होता. त्यामुळे विनेश आता काय चमत्कार करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. विनेशने आपला अनुभव पणाला लावले आणि तिने हा सामना ७-५ असा जिंकला. त्यामुळे आता विनेश ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. त्यामुळे हा सामना जिंकला तर तिला सुवर्ण किंवा रौप्यपदक पटकावता येऊ शकते.

विनेश फोगटने पहिल्या लढतीत चांगली कामगिरी केली होती. पण तिला जपानच्या सुसाकीवर ३-२ असा निसटता विजय मिळवता आला होता. विनेशसाठी हा विजय सर्वात महत्वाचा होता. कारण गेल्या ऑलिम्पिकमध्ये सुसाकीने गोल्ड मेडल जिंकले होते. त्यामुळे जेव्हा सुसाकीला विनेशने पराभूत केले, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा होता. विनेशकडे ऑलिम्पिकचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे तिच्याकडून यावेळी सर्वांना मोठ्या आशा होत्या.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!