पॅरिस : नीरज चोप्रा आता भाला फेकच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. नीरजने पहिल्या प्रयत्नामध्ये ८९.३४ मीटर भाला फेकला आणि त्याने थेट अंतिम फेरीत स्थान पटकावले. पात्रता फेरीत नीरज चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्याचबरोबर या मोसमातील देखील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्यामुळे नीरजने पहिल्याच प्रयत्नात जग जिंकलेलं होतं. कारण नीरजसारखी कामगिरी कोणालाही करता आली नाही. त्यामुळे नीरज आता सुवर्णपदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे नीरज सलग दुसरे सुवर्णपदक पटकावणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.
नीरज चोप्राने जेव्हा सरावाला आला तेव्हा त्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक पटकावले होते. पण यावेळी नीरज ९० मीटरच्या पुढे जाणार की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. कारण यापूर्वी नीरज कधीच ९० मीटरपर्यंत पोहोचला नव्हता. त्यामुळे नीरज यावेळी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.
नीरज ऑलिम्पिकपूर्वी जायबंदी झाला होता. त्यामुळे तो मोठ्या स्पर्धांमध्येही उतरला नव्हता. त्यामुळे ऑलिम्पिकमसाठी नीरज फिट आहे की नाही, याची उत्सुकता सर्वांना होती. कारण यापूर्वी नीरजने खेळताना कोणीच पाहिले नव्हते. पण त्याचवेळी नीरजने लौकिकाला साजेशी कामगिरी केली आणि अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.