पॅरिस : भारतीय पुरुष हॉकी संघाने स्पेनचा २-१ असा पराभव करत कांस्यपदक जिंकले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने २ गोल करत भारताला स्पेनविरुद्ध आघाडी मिळवून दिली जी अखेरीस निर्णायक ठरली. टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्यपदक जिंकले होते आणि आता सलग दुसऱ्यांदा पोडियमवर स्थान मिळवण्यात संघाला यश आले आहे.
भारताचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेशचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता आणि संघाने या दिग्गज खेळाडूला यादगार निरोप दिला. भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा श्रीजेश टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या संघाचा भाग आहे. अशा प्रकारे भारताने ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत १३ वे पदक जिंकले.