पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने इतिहास रचला आहे. अर्शद नदीम याने पाकिस्तानसाठी सुवर्ण पदक मिळवलं आहे. अर्शद पाकिस्तानसाठी भालाफेकीत वैयक्तिक पदक मिळवणारा पहिला तर एकूण तिसरा खेळाडू ठरला आहे. अर्शद पहिल्या थ्रोमध्ये अपयशी ठरला. मात्र त्याने दुसऱ्याच थ्रोमध्ये ऑलिम्पिक इतिहासातील सर्वात लांब विक्रमी थ्रो केला आणि सुवर्ण पदकावरचा दावा भक्कम केला. अखेरपर्यंत अर्शदपेक्षा कोणलाही लांब थ्रो करता आला नाही. यात भारताचा नीरज चोप्राही अपयशी ठरला. त्यामुळे अर्शदला गोल्ड मेडल मिळवण्यात यश आलं. तर नीरज चोप्रा सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल जिंकण्यात अपयशी ठरला. मात्र नीरजने भारताची निराशा केली नाही. नीरजने भारतासाठी रौप्य पदक मिळवलं.