देवेंद्र दरेकर
पोलादपूर : अपघाताचे प्रमाण सध्या वाढत चालले असून पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील कापडे बुद्रुक भवानवाडी फाट्याजवळ आज एसटी बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलादपूर बसस्थानकातून सुटलेली पोलादपूर गोवेळ बस ही कापडे गावाजवळ भवानवाडी फाट्याजवळ आली असता समोरून पोलादपूरकडे येणारे दुचाकीस्वार व त्याचे सहकारी यांची बसच्या चालक बाजूकडील मागच्या बाजूला ठोकर बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील 2 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सचिन संजय पवार (१९) व गणेश निकम (२५) हे जखमी झाले असून त्यांना तातडीने पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी पोलादपूर पोलीस व नरवीर रेस्क्यू टीमचे सदस्य तातडीने दाखल झाले.