अमोल पेणकर
रोहे : कोलकाता येथे ९ ऑगस्ट रोजी आर. जी. कार मेडिकल कॉलेज येथे ३१ वर्षीय निवासी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिच्या निर्घृण हत्येच्या घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळवी यासाठी रोहा तालुका मेडिकल चॅरिटेबल असोसिएशन व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवारी (दि. १७) रोहे तहसीलदार किशोर देशमुख यांना निवेदन देऊन आरोपी विरोधात कडक कारवाई करावी याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी काळी फीत लावून मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

कोलकाता येथे डॉक्टरवर अत्याचार व हत्या करण्यात आली हि घटना अतिशय दुदैवी आहे. एक महिला कामावर रुजू असतात अशी घटना घडते ही देशासाठी शरमेची बाब असल्याने त्यामुळे देभरातील सर्व डॉक्टरांनी निषेध व्यक्त करुन एक दिवसीय काम बंद ठेवण्यात आले आहे. एक महिलेची अशाप्रकारे गॅंगरेप करून हत्या करण्यात आली त्यामुळे या आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी रोहे मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र धात्रक यांनी केली आहे.
यावेळी सचिव डॉ. संकेत म्हात्रे, डॉ. अशोक जाधव, डॉ. अभय ससाणे, डॉ. निशीथ ध्रुव, डॉ. रघुनाथ भट, डॉ. आनंद वागळे, डॉ. तेजकुमार आपणकर, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. अतुल पाटील, डॉ. रूपेश होडबे, डॉ. विनोद किणीकर, डॉ. मुकेश सिंग, महिला डॉक्टर मीनल वागळे, डॉ.पूर्वी ध्रुव, डॉ. नंदिनी तेलंगे, डॉ. योगिनी घायले, डॉ. ऋचा वागळे, डॉ. सविता किणीकर, डॉ. रचना माळी, डॉ. तनुजा पवार, डॉ. श्वेता सिंग, डॉ. पूजा भट, डॉ. मनीष वैरागी, डॉ. तुषार राजपूत, डॉ. विनोद गुडसुरकर, डॉ. कांचन पाटील यासह तालुक्यातील ६० डॉक्टर उपस्थित होते.
सदर घटना अतिशय दुदैवी आहेच, परंतु या महिलेला न्याय मिळावा यासाठी हा खटला न्यायालयात फास्टट्रॅकवर चालवण्यात यावा जेणेकरून पुन्हा अशा प्रकारे महिला डॉक्टरांवर हल्ला करण्याची हिम्मत करणार नाही, आरोपीवर कठोरपणे कारवाई करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन रोहाचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी केली आहे.