• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शिंदे गटाच्या आमदाराचा प्रताप, ‘लाडक्या लेका’ला तलवारीच्या टोकाने भरवला केक

ByEditor

Aug 17, 2024

बुलढाणा: आपल्या वेगवेगळ्या कारनाम्यांमुळे चर्चेत येणारे शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या कारनाम्यामुळे चर्चेत आले आहेत. इतर वेळी ते धमक्या देण्यासाठी, मारहाण या गोष्टीमुळे चर्चेत येतात मात्र, यावेळी ते वेगळ्याचं कारणाने चर्चेत आलेत. आमदार गायकवाड यांनी आपल्या लाडक्या पुत्राच्या वाढदिवसा निमित्त तलावारीनं केक भरवला आहे. हा फोटो सोशल मिडीयावरती चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा काल बुलढाण्यात वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. काल रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी भल्या मोठ्या तलवारीने स्टेजवर केक कापला व कापलेला केक तलवारीनेच आपल्या पत्नी आणि मुलाला भरविला. या सर्व कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमात आता जोरदार व्हायरल होत आहे. सामान्य व्यक्तीने तलवारीने केक कापल्यास त्या व्यक्तीवर आर्म ॲक्ट नुसार गुन्हा दाखल होतो, मात्र आता शिंदेंच्या शिलेदाराने तलवारीने केक कापून त्यास तलवारीने आपल्या पत्नी पूजा गायकवाड व मुलांना केक भरवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!