• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रोज प्या दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक, आयुष्यासाठी वरदानपेक्षा नाही कमी

ByEditor

Aug 20, 2024

रायगड जनोदय ऑनलाइन
रात्री जेवल्यावर काय करावे हे अनेकांना समजत नाही. अशावेळी फिरल्यानंतर अनेकजण झोपतात. आज आपण अशा ड्रिंकबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्यायल्यानंतर झोप सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू तीक्ष्ण होऊ लागतो. दूध, बडीशेप आणि खडीसाखर हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, पोटॅशियम आणि आयर्न भरपूर असते. दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे. या तिन्ही पदार्थांचे ड्रिंक पिण्याचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.

स्ट्रेससाठी प्रभावी
दिवसभर कामाची चिंता, तणाव वाढू लागतो, त्यामुळे डोकेदुखी सुरू होते. अशावेळी, बडीशेप आणि खडीसाखर मिसळून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हे ड्रिंक प्यायल्याने मन शांत राहते आणि स्ट्रेस हार्मोन्स तणाव निर्माण होऊ देत नाहीत.

पोटाच्या समस्येपासून होईल सुटका
आजकाल लोकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास जास्त होतो. यासाठी चांगल्या खाण्या-पिण्यासोबतच असे काही ड्रिंक प्यावे, ज्यामुळे पोटाचा त्रास होणार नाही, अशावेळी खडीसाखर आणि बडीशेप मिसळून दूध प्यावे, हा एक चांगला पर्याय आहे. बडीशेपमध्ये एस्ट्रेंजेल आणि अ‍ॅनेथोल गुणधर्म असल्यामुळे ती जुनाट बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. (Wonder Drinks Mixture)

त्वचेसाठी फायदेशीर
पावसाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागतात, त्यासाठी महागड्या क्रिमचा वापर केला जातो. जर तुम्हाला नेहमी त्वचेची अ‍ॅलर्जी आणि मुरुमांची समस्या होत असेल तर अशावेळी दूध, बडीशेप आणि खडीसाखरचे ड्रिंक प्यावे, कारण बडीशेपमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

डोळ्यांच्या समस्येपासून सुटका
दिवसभर कॉम्प्युटर किंवा मोबाईलसमोर काम केल्याने डोळ्यांवर खोलवर परिणाम होतो.
दूध, बडीशेप आणि खडीसाखर पिऊन डोळ्यांवरील हे परिणाम कमी करता येतात.
कारण बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आढळते, ज्यामुळे दृष्टी स्वच्छ राहण्यास मदत होते.

(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!