• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बदलापूर आंदोलनातील आंदोलक ‘बदलापूरकरच’

ByEditor

Aug 22, 2024

आंदोलनातल्या २५ अटक आरोपींपैकी २३ जण बदलापुरचे; दोघे रायगडचे

मुंबई : बदलापुरात दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारांनंतर उसळलेल्या आंदोलनातील सहभागी हे बदलापूर शहराचेच नागरिक असल्याचं उघड झालंय. या आंदोलनात आतापर्यंत अटक झालेल्या २५ जणांपैकी दोन जण रायगड जिल्ह्यातले असून १ जण वांगणीच्या कासगाव येथील आहे. त्यांच्या राहत्या पत्त्यांची नोंद त्यांच्यावर दाखल एफआयआरमध्ये झाल्याने ही बाब उघड झाली. यामुळे बदलापूर शहरातल्या आंदोलनात बदलापूरकर नसल्याची राजकीय नेत्यांची ओरड उघडी पडली आहे.

बदलापूर शहरात २० ऑगस्टला झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले आहेत. मात्र, हे आंदोलक बदलापुरातील नसून बाहेरचे असल्याची भूमिका स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. तसेच, भाजपचे स्थानिक आमदार किसन कथोरे, शिवसेनेच्या शिंदे गटाचे वामन म्हात्रे यांनी देखील हाच पवित्रा घेतला होता. यामुळे बदलापुरात भडकलेले आंदोलन हे बदलापूरकरांचे की बाहेरच्यांचे? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, या आंदोलनात अटक झालेल्या २५ जणांवरून खुलासा झालाय की हे आंदोलक शहरातील होते. त्यांच्यावर नोंद झालेल्या एफआयआरमध्ये त्यांचे पत्ते नमूद करण्यात आले आहेत. यातील रायगड जिल्ह्यातील उकरूळ येथील एक, भिवपुरी येथील दुसरा तर बदलापूर शहराच्या हद्दीपासून जवळच्या कासगांव येथील एक असे ३ अटक आंदोलक शहराबाहेरील आहेत. तर उर्वरित २२ आंदोलक हे बदलापूरचे रहिवासी आहेत. तसेच,यातील प्रमुख २५ आरोपी आणि त्यांची नावे पाहता ते देखील बदलापूर शहरातील असल्याचं उघड झालंय.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!