• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सावधान! जेवताना तुम्हीही खाताय थंड अन्नपदार्थ? आरोग्यावर होऊ शकतात घातक परिणाम

ByEditor

Aug 24, 2024

रायगड जनोदय ऑनलाईन
बऱ्याचदा तुम्ही काही लोकांचे म्हणणे ऐकले असेल की, ते गरम अन्न खाण्याऐवजी थंड अन्न खाणे पसंत करतात. कधी ही निवड त्या व्यक्तीची सवय असते तर कधी बळजबरी असते. कारण काहीही असो, तुम्हाला माहिती आहे का की, थंड अन्न खाण्याची तुमची सवय तुम्हाला काही वेळातच आजारी बनवू शकते. पारंपारिक चायनीज मेडिसिन (TCM) नुसार, थंड अन्न खाल्ल्याने पोट फुगणे, आतड्यांना सूज येणे आणि मुरडा मारणे यासारख्या आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. विशेषत: महिलांसाठी थंड अन्न खाण्याचे जास्त दुष्परिणाम होतात.

थंड अन्न खाण्याचे दुष्परिणाम-
पाचन-
थंड अन्न खाल्ल्याने माणसाला पोटाचा त्रास होऊ शकतो. तर गरम अन्नामुळे पोट खराब होण्याचा धोका कमी होतो. गरम अन्न शरीरात पोहोचते आणि सहज पचते. आम्ही तुम्हाला सांगतो की, काहीवेळा थंड अन्न खाल्ल्याने पोटात मुरडा मारू लागतो. ज्यामुळे तुम्हाला पोटात अतिशय वेदना होऊ शकतात. आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कमकुवत पचनक्रिया –
थंड अन्न खाल्ल्याने शरीरातील चयापचय कमकुवत होऊ शकतो. तर गरम आणि ताजे अन्न खाल्ल्याने चयापचय क्षमता वाढू शकते. वास्तविक, थंड अन्न पोटात गरम करण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मात्र मंदावते. त्यामुळे वजन आटोक्यात आणण्याचा वेगही कमी होतो.

गॅस आणि सूज येणे-
थंड अन्न खाल्ल्याने गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर, थंड अन्न, विशेषत: थंड भाताचे सेवन, गॅस आणि ब्लोटिंगची समस्या वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे शक्यतो जेवताना जेवण गरम असल्याची खात्री करून घ्यावी.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!