दीपक जगताप
रसायनी-चौक : देवनाव्हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित व राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष अंकितशेठ साखरे यांच्या सौजन्याने पाली फाटा येथे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उरण, पनवेल, रायगड, नवी मुंबई आणि परिसरातील नामांकित गोविंदा पथक या ठिकाणी सलामी देण्यासाठी व दहीहंडी फोडण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम मराठी कलाकार प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे, मालिका मुरांबा फेम रमा शिवानी मुधेकर उपस्थित राहून गोविंदाचे मनोरंजन करणार आहेत. गोविंदाचा उत्साह वाढविण्यासाठी एकूण 1,11,111रुपये असे पारितोषिक असून महिला गोविंदा पथक 5 थर सलामी 15 हजार रुपये व आकर्षक चषक तसेच पुरुष गोविंदा पथक 6 थर सलामी 11,111 रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.
अंकित साखरे म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक नाते. अंकित साखरे यांच्यामार्फत विविध सण, उत्सव हे समाजातील सर्व घटकांना एकत्रित आणून गुण्या गोविंदाने साजरे केले जातात. त्याचप्रमाणे यंदा मोठ्या जोशात व उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्साहाचे दिमाखदार आयोजन यावर्षीही पाली फाटा येथे करण्यात आले आहे. तरी सर्व गोविंदा पथक व गोविंदा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक जिल्हा अध्यक्ष अंकितशेठ साखरे यांनी केले आहे.