श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, संचालक जयराम मारुती पवार सर यांचा ७५वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा पतसंस्थेचे चेअरमन विलास चौलकर व सर्व संचालक मंडळ, कर्मचारी यांच्या पुढाकाराने पवार सरांची पत्नी सौ. संगिता पवार, त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हाॅटेल इंद्रप्रस्थ, नागोठणे येथे मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा झाला. यावेळी त्यांना शुभेच्छा देतांना केएमजी विभागातील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार किरण लाड, सामाजिक कार्यकर्ते अनिल नागोठणेकर, मराठी उद्योजक संतोष नागोठणेकर, पत्रकार मिलिंद घाग आदी छायाचित्रात दिसत आहेत.