रायगड जनोदय ऑनलाइन
आजच्या काळात चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोक गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. मधुमेह हा एक प्रकारचा मेटाबॉलिक आजार आहे ज्यामध्ये ब्लड शुगर लेव्हल अनियंत्रितपणे वाढते आणि कमी होते. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना त्यांच्या खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात त्या पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे त्यांची ब्लड शुगर कंट्रोल राहील.
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मधुमेहाने त्रस्त लोकांच्या शरीरात अशक्तपणा येतो. अशा स्थितीत रुग्णांनी निरोगी जीवनशैली अंगीकारली पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या आवडीचे जेवण मिळू शकत नाही. फक्त खाण्याची पद्धत आणि काही गोष्टी बदलाव्या लागतील.
मधुमेहाच्या रुग्णांनी जेवणात या पदार्थांचे करावे सेवन –
१. आळशीच्या बिया (Flax Seeds) :
हेल्थ लाईननुसार, आळशीमधील फायबर आणि अल्फा लिनोलेनिक अॅसिड ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. आळशीच्या बिया शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाणही नियंत्रणात ठेवतात. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.
२. हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables) :
मधुमेहाच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी हिरव्या भाज्यांमध्ये देखील आढळते, जे टाइप 2 रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. ज्यामध्ये तुम्ही बथुआ, ब्रोकोली, दुधी, तोंडली, पालक, मेथी, कारले अशा भाज्या खाऊ शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या भाज्यांमध्ये कमी कॅलरीज आणि अधिक पोषकतत्व असतात.
३. भाजलेला लसूण (Roasted Garlic) :
संशोधनानुसार, लसूण शरीरातील अमीनो एसिड होमोसिस्टीन नियंत्रित करतो, जे ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करते. याशिवाय भाजलेला लसूण शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी खूप गुणकारी मानला जातो.
४. दही (Yogurt) :
हेल्थ लाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, दह्यामध्ये आढळणारे सीएलए शरीरातील हेल्दी ब्लड शुगर वाढवते.
कारण दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन-डी चांगल्या प्रमाणात असते.
सीएलए एक चरबी आहे जी वजन कमी करण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्याचे काम करते.
५. अंडी (Eggs) :
अंड्यांमध्ये भरपूर प्रोटीन आणि सर्व अमीनो अॅसिड असतात, जे रोज खाल्ल्याने टाइप 2 मधुमेह, कोलेस्ट्रॉलचा धोका टाळता येतो.
(Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.)