उरण : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने कमी कालावधीत चांगली कामगिरी केली आहे. उरणमध्ये आदर्श पतसंस्थेस सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिले. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेची 16 वी शाखा सुरू करण्यात आली आहे. या उरण शाखेचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शनिवारी (दि. 15) करण्यात आले. त्यावेळी आमदार महेश बालदी बोलत होते. यावेळी आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मिनी एटीएम मशीनचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आदर्श पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक कौशिक शाह, संस्थेचे संचालक अनंत म्हात्रे, सतीश प्रधान, सुरेश गावंड, विलाप सरतांडेल, जगदीश पाटील, भगवान वेटकोळी, रामभाऊ गोरीवले, संजय राऊत, सीईओ मीनाक्षी पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील, अल्पसंख्याक सेल जिल्हा अध्यक्ष जसिम गॅस, माजी नगरसेवक नंदू लांबे, हितेश शाह, धनाजी ठाकूर, माजी जि.प. सदस्य चारुदत्त पाटील, माया पाटील, म्हातवली सरपंच रंजना पाटील, महेश घरत आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षात संस्थेने जी सामाजिक कामे केली ती तसेच स्थापनेपासून संस्थेने केलेली प्रगतीचा आढावा उपस्थित ग्राहकांसमोर मांडला. 25 वर्षांत संस्थेने 312 कोटी ठेवी व 212 कोटी कर्ज वाटप केले असून एकत्रित व्यवसाय 525 कोटी पूर्ण केला असल्याचे त्यांनी संगितले. संस्था ग्राहकांसाठी मिनी एटीएम मशीनद्वारे कोणत्याही बँकेच्या डेबिट कार्डमधून पैसे काढण्याची सुविधा देते.संस्था ग्राहकांसाठी मोबाईल अॅप सुविधा देत असून त्याद्वारे आरटीजीएस, नेफ्ट, आयएमपीएस सुविधा तसेच मोबाइल, डिश टीव्ही रिचार्ज, क्युआर कोड सुविधासुद्धा पुरवित आहे. संस्थेचे एनपीए शून्य टक्के आहे. ऑडिट वर्ग स्थापनेपासून ‘अ वर्ग ‘ आहे. संस्था आर्थिक व्यवहारासोबत सामाजिक कार्य करीत असते, असे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सांगितले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष श्री कैलास जगे यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सीओ उमेश पाटील व एचआर स्नेहा पोंगडे यांनी केले.