• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

‘चोंढीचा राजा’ साखरचौथ गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन व विसर्जन

ByEditor

Sep 26, 2024

अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून घेतले ‘श्रीं’चे दर्शन

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे प्रसाद (पिंट्या) गायकवाड मित्र मंडळ, ग्रामस्थ चोंढी व युवा एकता जनकल्याण सामाजिक संस्था, अलिबाग यांच्यावतीने ‘चोंढीचा राजा’ साखरचौथ गणपतीचे किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात शनिवार, दि. २१ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात वाजतगाजत मिरवणुकीत आगमन झाले होते. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह मंडळाचे अध्यक्ष पिंट्या गायकवाड यांच्यासह उपाध्यक्ष, सभासद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव ॲड. प्रविण ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य काका ठाकूर, रवी नाना ठाकूर, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते पिंट्या ठाकूर, भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख दिलीप (छोटमशेठ) भोईर, किहीम ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सदस्या यांच्यासह विविध शासकीय अधिकारी, मांडवा पोलीस निरीक्षक श्री. भोई, उपनिरीक्षक श्री. जगताप व त्यांचे इतर सहकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आणि गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेत मंडळाला उत्कृष्ट आयोजन व नियोजन केल्याबद्दल कौतुक करत शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन दिवस अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पहिल्या दिवशी वाजतगाजत गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आरती, संध्याकाळी जगन्नाथ बुवा खारगावकर, मु. कुडगाव – श्रीवर्धन येथील भजन मंडळाने अप्रतिम असे भजन सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. यानंतर रात्री दहाच्या सुमारास सासवणे येथील महिला मंडळातर्फे पारंपारिक नाचाचे कार्यक्रम सादर केले.

दुसऱ्या दिवशी सकाळी आरती नंतर संस्कृती कला केंद्र सेवाभावी संस्था चोंढी या संस्थेच्या सिद्धी घरत, स्नेहा पोंगडे यांच्यावतीने अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यासोबतच किहीम येथील कालभैरव प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन आयोजित करण्यात आले होते. संध्याकाळी गणपतीच्या शेवटच्या आरतीनंतर भव्य रथातुन काढलेल्या विसर्जन मिरवणुकीत हिंदुराजा गुरुकुल शिवकालीन विद्या मर्दानी खेळ आखाडा, संगमनेर यांनी मर्दानी खेळाचे थरारक प्रात्यक्षिके सादर केली होती. सदर मर्दानी खेळ पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी मांडवा पोलिसांनी विशेष काळजी घेतली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!