• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कर्जत-माथेरानच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरेंचा पुढाकार

ByEditor

Sep 27, 2024

पायाभूत सुविधांची कामे वेगात करण्याचा निर्णय

प्रतिनिधी
ठाणे :
कर्जत व माथेरान परिसरातील नागरिकांना अखंडित वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुका संघर्ष समितीने सातत्याने खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मंजूर करण्यात आल्या. तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना अतिरिक्त निधी मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार डावखरे यांनी दिली.

कर्जत व माथेरान परिसरातील वीज समस्येबाबत आमदार निरंजन डावखरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य वीज पारेषण कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांच्यासह ऊर्जा खात्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर महावितरण अधिकारी व संघर्ष समितीची काल एकत्रितरित्या ठाण्यात बैठक झाली. या बैठकीला महावितरणच्या पेण मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम मा्ने, कार्यकारी अभियंता विद्यानंद शिंदे, कर्जत उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत केंद्रे, भाजपा उत्तर रायगड जिल्ह्याचे सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीचे संयोजक कैलास मोरे, सदस्य रंजन दातार आदी उपस्थित होते. या बैठकीत वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या निधीबाबत केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले.

कर्जत व माथेरान शहरासाठी स्वतंत्रपणे एक्सप्रेस फीडर कार्यरत असून, वीजपुरवठा सलग सुरू राहण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. शिरसे येथे वीज उपकेंद्राचे कामे वेगाने पूर्ण केले जाईल, वाढत्या वीज मागणीनुसार ट्रान्सफॉर्मर उभारण्याच्या मागणीला प्राधान्य दिले जाईल, कर्जत शहर आणि नेरळ ते माथेरानपर्यंत वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निधी मंजूर केला जाईल, केंद्र सरकारच्या आरडीएसएस योजनेतून पायाभूत सुविधांची कामे सुरू असून, आणखी दोन इनकमर बसविण्याचे काम सुरू आहे. तर ४१ नवे ट्रान्सफॉर्मर व १०२ ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेत वाढ केली जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर ग्राहक तक्रार निवारण शिबीर रविवारी आयोजित करण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संमती दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!