• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबईची लोकलसेवा कोलमडली! चाकरमान्यांची कोंडी

ByEditor

Oct 8, 2024

मुंबई : मध्य रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटल्याने या मार्गावरची लोकल सेवा कोलमडली आहे. या मार्गावरच्या स्लो आणि फास्ट लोकल ठप्प झाल्याने सकाळी सकाळी ऑफिसला जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. ही ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यासाठी वेगाने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती रेल्वेने एक्सवर पोस्ट करून दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही ओव्हर हेड वायर दिवा आणि कोपरदरम्यान रेल्वे स्थानकादरम्यान तुटली आहे. या ठिकाणी वायरचा तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. यामुळे या स्थानकावर स्लो मार्गावर येणाऱ्या लोकल ट्रेन अडकून पडल्या आहेत. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

या बिघाडाची माहिती मिळताच रेल्वेचे कर्मचाऱ्यांनी तातडीने दिवा स्थानकावर व कोपरा स्थानकावर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या मार्गावरील रखडलेली वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, सकाळी मोठ्या प्रमाणात कामासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असल्याने या मार्गावरील रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाली आहे. मात्र, लोकल येत नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!