• Fri. Jun 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी पोलिसांची सर्वात मोठी कारवाई, पनवेल, कर्जतमधून 5 आरोपींना अटक

ByEditor

Oct 18, 2024

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली आणि अम्बरनाथमध्ये राहाणारे आहेत. नितीन गौतम सप्रे (वय 32, डोंबिवली), संभाजी किशन परबी (वय 44, अंबरनाथ), राम फुलचंद कन्नौजिया (वय 43, पनवेल), प्रदीप तोंबर (वय 37, अंबरनाथ) आणि चेतन दिलीप पारधी (वय 33, अंबरनाथ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यातील नितीन सप्रे आणि राम कन्नौजिया यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या चालवणाऱ्या आरोपींना तीन हत्यारं दिली होती. ही हत्यारंही पोलिसांनी जप्त केली आहेत.

सप्टेंबर महिन्यात हल्ल्यातील दोन आरोपी एका दिवसासाठी नितीन सप्रे आणि राम कन्नौजियाबरोबर कर्जतमध्ये थांबले होते. यादरम्यान या दोघांनी आरोपींना काही पैसेही दिले होते. आता आरोपींनी बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण कुठे घेतलं याचा पोलीस तपास करत आहेत. नितीन सप्रे हल्ल्याचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या संपर्कात होता. हल्लेखोर शिवकुमार आणि धर्मराज हे कुर्लात राहाण्याआधी कर्जतमध्ये एक रुम भाड्याने घेऊन राहात होते. पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी तुर्कीत बनवलेल्या 7.62 एमएम च्या टिसास पिस्तुलात गोळीबार केला होता. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि कर्जतमध्ये पोलिसांनी छापेमारी केली. तिथून या पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्कात होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!