मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 99 उमेदवारांचा समावेश आहे. अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांना नांदेडच्या भोकरमधून संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या गणेश नाईक यांना ऐरोली मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं आहे.
जाहीर केलेल्या यादीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिममधून,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कामठीतून,मंत्री गिरीश महाजन जामनेरमधून,मंत्री सुधीर मुनगंटीवार बल्लारपूरमधून, श्रीजया अशोक चव्हाण भोकरमधून, आशिष शेलार वांद्रे पश्चिममधून, मंगल प्रभात लोढा मलबार हिलमधून निवडणूक लढवणार आहेत. कुलाब्यातून राहुल नार्वेकर, साताऱ्यातून छत्रपती शिवेंद्रराजे भोसले जाहीर केले आहे. पुढील यादी खालीलप्रमाणे…






