• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

शाम भोकरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

ByEditor

Nov 15, 2024

भोकरे यांच्या प्रवेशामुळे नवगणेंचे पारडे जड

गणेश प्रभाळे
दिघी :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता शामकांत भोकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पुणे मोदी बाग येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

भोकरे यांनी आपल्या रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता पदाचा व सदस्यत्वाचा मागील दिवसात राजीनामा दिला होता. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांना अधिकृतपणे राजीनामा पाठवत भूमिका मांडली होती. निवडणुकीच्या तोंडावरच हा राजीनामा दिल्याने मतांची आकडेवारी बदलण्याची शक्यता वर्तवली जातेय.

या राजीनाम्यात त्यांनी कौटुंबिक कारणास्तव पक्षाचे काम करणे शक्य नसल्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे भोकरे यांनी आपल्या राजीनाम्यात म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी राजीनामा देत गुरुवारी (ता. 14) राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हातात घेतली आहे.

स्थानिक गटबाजीच्या राजकारणाला कंटाळून सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे भोकरे यांनी प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यापुढे महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचा प्रचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शाम भोकरे यांनी गेल्या काही वर्षांत आठहून अधिक वेळा पक्षांतर केले असल्याची टीका स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षांतरामुळे श्रीवर्धन विधानसभा निवडणुक मतदार संघात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!